Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Divya Pahuja : गुरुग्राममध्ये मॉडेलची हत्या, BMW कारमध्ये नेला मृतदेह

Spread the love

गुरुग्राम: दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये 27 वर्षीय मॉडेलची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिव्या पाहुआ असे मृत मॉडेलचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या पाहुजाची हत्या गुरुग्रामच्या बसस्थानकाजवळील सिटी हॉटेलमध्ये काल रात्री झाली. या खूनप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. तसेच, मुंबईतील गँगस्टर संदीप गडोली याच्या 2016 मध्ये झालेल्या खून प्रकरणातील आरोपींमध्ये दिव्या पाहुजाचे नावही असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगर येथील रहिवासी होती. ती मृत गुंड संदीप गडोलीची प्रियसी होती. गडोलीचे फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये एन्काउंटर करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी पाहुजा सह तिच्या आई आणि पाच गुरुग्राम पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचा एफआयआर नोंदवण्यात आला होता.

दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यानुसार, 2 जानेवारीला पहाटे 4:18 वाजता तीन जण हॉटेलमध्ये शिरल्याचे दिसले. ते दुसरा कोणी नसून हॉटेल मालक अभिजीत, दिव्या पाहुजा आणि आणखी एक तरुण आहे. तिघेही हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचतात, ते काही वेळ बोलतात आणि तिघेही हॉटेलच्या आत जातात.

त्यानंतर साडेअठरा तासांनंतर म्हणजेच 2 जानेवारी रोजी रात्री 10.44 वाजता दोन तरुणांनी चादरीमध्ये गुंडाळलेला मृतदेह बाहेर ओढून नेला. हा मृतदेह दिव्या पाहुजाचा होता. यानंतर आरोपींनी दिव्याचा मृतदेह डीडी ०३ के२४० क्रमांकाच्या बीएमडब्ल्यूच्या ट्रंकमध्ये टाकून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, दिव्याचा मृतदेह घेऊन आरोपी कुठे गेले, याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही.

दिव्या पाहुजा हि गँगस्टर संदीप गडोली एन्काउंटर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. दिव्याच्या बहिणीने या घटनेमागे गडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि गुंडाचा भाऊ ब्रह्मप्रकाश यांचा कट असल्याचे सांगितले आहे.

दिव्या पाहुजाच्या बहिणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2 जानेवारीच्या सकाळपर्यंत आपण दिव्याशी बोललो होतो, पण जसजशी रात्र झाली तसतसा दिव्याचा नंबर अनरिच झाला, त्यामुळे तिला संशय आल्याने तिने हॉटेल मालक अभिजीतला फोन केला. पण दिव्यांबद्दल काहीही सांगायला तो टाळाटाळ करू लागला.

दरम्यान, गुन्हे शाखेने अभिजीत, प्रकाश आणि इंद्रज या मारेकर्‍यांना अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अभिजीत हा हॉटेलचा मालक असून, प्रकाश आणि इंद्रज हे हॉटेलमध्ये काम करायचे. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना 2 जानेवारी रोजी रात्री उशिरा सेक्टर 14 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जिथे पोलिसांना माहिती मिळाली की गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा नावाची 27 वर्षीय तरुणी दिल्लीतील व्यापारी आणि सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजीतसोबत फिरायला गेली होती. या प्रकरणी आम्ही तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!