Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maratha Arakshan : 20 जानेवारीला मराठा मोर्चा थेट मुंबईत धडकणार

Spread the love

मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या म्हणजेच 24 डिसेंबरल शेवटचा दिवस आहे. त्याआधी बीडमध्ये आज (23 डिसेंबर) मनोज जरांगे यांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार आहे. मुंबईमध्ये 20 जानेवारीला आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही

बीडमधील झालेल्या इशारा सभेत आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात अली आहे. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका,आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा.

पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे. सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावेत. एकदा अंतरवलीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला यावेळे दिला.

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण

मुंबईतील आझाद मैदानात 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. दरम्यान ते म्हणाले, आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. अंतरवाली हून मराठ्यांचा जनसागर मुबंईला जायचे आहे. मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, कोणी गाडी पेटवायला लागला तर त्याला जाग्यावर पकडून पोलिसांकडे द्यायचे, आपला असेल तरी त्याला पकडून पोलिसांकडे द्या.

मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री यांना विनंती आहे. मराठा समाजाच्या लेकरांच्या पाठीशी उभे रहा. जर पाठीशी उभे नाही राहिलात तर मराठ्यांचे घर तुम्हाला कायम स्वरूपी बंद राहिल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले.

निष्पाप मुलांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे काम सरकारने केले

या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, बीडमध्ये मराठ्यांचे वादळ आले आहे. हा मराठ्यांचा महाप्रलय आहे.

मुंगी शिरायला जागा नाही, या गर्दीला नतमस्तक होत आहे. बीडमध्ये घरं, हॉटेल जाळले, आपल्यावर डाग लावला, यांनीच स्वत:च्या घराला आग लावली, आमची पोरं गुतवली. निष्पाप मुलांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे काम सरकारने केले आहे. मराठ्ंयानी शंताता रॅली काढली होती.

(छगन भुजबळ) येवल्याचे येडपट त्यांनीच त्यांच्या पाहुण्याचे हॉटेल जाळले, आता बारीक आवाजात बोलतोय. आधी कळत नव्हतं का? मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे सरकारने शहाणपणची भूमिका घ्यावी. देशातील सगळ्या मोठ्या जातीचे घात करण्याचा तुम्ही घाट घातला आहे असे वाटायला लागले, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

जरांगे पाटील यांनी गर्भित सरकारला इशारा दिला. ते म्हणाले की, आमच्या नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवू, आता आरक्षण नाही दिले तर सरकारला जड जाणार आहे. यांचा प्रॉब्लेम एकच आहे, मी यांना मॅनेजच होत नाही. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत मराठ्यांची एकजूट तुटू देणार नाही.

20 जानेवारीला मराठा मोर्चा थेट मुंबईत धडकणार

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठा दिलासा क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!