Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठा दिलासा क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठा दिलासा.  राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.  याबाबत माहिती देतांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे की, “क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. याच अर्थ असा होतो की, क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल.

Advertisements

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह (Curative Petition) याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती.

Advertisements
Advertisements

दरम्यान, सुनावणीत राज्य सरकारने आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र, आता न्यायालयाने अखेर आज क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारसाठी आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.

आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी खुल्या कोर्टात होण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने मराठा आरक्षणाबाबत हा मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला असल्याचे देखील बोलले जात आहे. आता 24 जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जरांगे यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये – रामदास आठवले

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!