Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : आणखी एका भीषण अपघातात वर – वधूसह पाच जण जागीच ठार….

Spread the love

रायपुर : काल मध्यरात्री उत्तर प्रदेशातील बरेली-नैनिताल महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जण होरपळून ठार झाल्याचे वृत्त ताजे असतानाच छतीसगड मध्ये लग्नाहून परतणाऱ्या वधू वराच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नववधू-नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गाडीला धडक मारून आरोपी ट्रकचालकाने पळ काढल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

अपघाताची अधिक माहिती अशी की, लग्न आटोपून वधू वराला घेऊन वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून परतत असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना हा अपघात घडला. नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचून तपास करत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढली. जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेले, मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एका लग्नात सहभागी होऊन बालोदा येथे परतत होते. ट्रक चालकाने गाडीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रक सोडून घटनास्थळावरून पळ काढला. तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

पहाटे पाच वाजेच्या सुमारास पकारिया जंगलातील चंडीदेवी मंदिराजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. धडकेचा आवाज ऐकून स्थानिकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हाती काहीच लागलं नाही. या या भीषण अपघाताची माहिती मिळताच वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. अधिक माहितीनुसार
बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं शनिवारी रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!