Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : कारला भीषण अपघात, लहान मुलासह आठ जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love

बरेली :  उत्तर प्रदेशातील बरेली-नैनिताल महामार्गावर एक मोठाअपघात झाला असून त्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मारुती एर्टिगा कारचा टायर फुटल्याने ती नियंत्रणाबाहेर जाऊन डंपरवर आदळल्याने अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार सेंट्रल लॉक असल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.

शनिवारी मध्यरात्री बरेली-नैनिताल महामार्गावरील भोजीपुराजवळ हा अपघात झाला. मारुती एर्टिगा कारचा टायर पुढे जात असताना अचानक फुटला, त्यानंतर कारचे नियंत्रण सुटले आणि उत्तराखंडमधील किच्छा येथून वाळू आणि खडी घेऊन जाणाऱ्या डंपरला धडकली.

दोन्ही वाहनांच्या धडकेने मोठा स्फोट झाला. यामुळे महामार्गालगत राहणारे नागरिक खडबडून जागे झाले. ते घराबाहेर पडले. मात्र धडकेनंतर कार आणि डंपरमधील ज्वाळा एवढ्या जोरात होत्या की त्यांच्या जवळ जाणेही शक्य झाले नाही. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. कारमधील सर्व लोक लग्नासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली मात्र कार आतून बंद असल्याने सर्व प्रवासी गाडीत अडकले आणि आगीत होरपळून मृत्यू झाला. ही अर्टिगा कार बहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील नारायण नागला येथील रहिवासी फुरकान याने बुक केली होती. या कारमध्ये तोही स्वार होता, अशी माहिती समोर आली आहे.

बरेलीहून बहेरीला परतत असताना अपघात झाला.

या घटनेची पुष्टी करताना बरेली एसएसपी यांनी सांगितले की, कारमध्ये 8 लोक होते. त्यांनी सर्वांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पोलीस पथकाने सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या अपघातात एका मुलाचाही मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

पोलिसांनी वाहन क्रमांकावरून चालकासह दोघांची ओळख पटवली आहे. उर्वरित लोकांचीही ओळख पटवली जात आहे. मात्र, ट्रकमध्ये जळालेला मृतदेह आढळून आला नाही. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याचा संशय आहे. त्याच्या क्रमांकाच्या आधारे ट्रकचाही शोध घेतला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!