Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

OBCNewsUpdate : न्या. शिंदे समिती तत्काळ बरखास्त करा , मराठ्यांना दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्राला स्थगिती द्या , ओबीसी मेळाव्यात भुजबळ काय बोलले ?

Spread the love

हिंगोली : मराठा सामाजाचे मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे त्यामुळे त्यांना मागास ठरविण्याचा खटाटोप ओबीसी आयोगाने कारू नये. शासनाने नियुक्त केलेली न्या. शिंदे समिती तत्काळ बरखास्त कारवाई, या समितीच्या स्थापनेनंतर देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्यावी , गावबंदी करणारांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकाव अशा मागण्या करीत राज्याचे पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते आपली तोफ डागली. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करीत त्यांनी मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा टीका केली. 

हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यात बोलताना  भुजबळ म्हणाले की , मला आमदारपदाची  किंवा मंत्रीपदाची लालसा नाही. मी काही बोललो तर अनेकांना वाटते दोन  समाजात तेढ निर्माण करतोय. अरे बाबांनो, त्यांच्या १५-२० सभा झाल्यावर आमची सभा होतेय. आम्ही काही बोललो नाही. माझा खुटा उपटायला मी तुझे काय केले? फोनवरून शिव्या, मेसेज देतायेत. मला आलेल्या शिव्या गलिच्छ भाषेत आहेत. तुमची हिंमत असेल तर वाचा, सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या असं मी पत्रकारांना म्हटलं.

मी आणि माझे कुटुंब गेली २ महिने या शिव्या वाचतोय, ऐकतोय आम्ही कसं जगायचे? मी कुठे दगड मारला, टायर जाळला आम्ही काही केले नाही. ते जाळतायेत, घरदारे पेटवली त्यांना सांगा. पेटवायला अक्कल लागत नाही तर बनवायला अक्कल लागते अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच रोहित पवार हे नवीन नेत्यांना भेटायला गेलेत, तिथे संदीप क्षीरसागर यांनाही नेले. कदाचित बॉम्ब फेकले तिथे अर्धाच बंगला जळाला, एकही मेला नाही. माफ करा, कशाला गेला, तुझी बायकापोरं संकटात टाकली त्याला भेटायला का गेला? बीडमध्ये एवढी घरे जळाली, हॉटेल जळाली तिथे जाऊन बघायला हवे होते. धीर द्यायला हवा होता. निषेध करायला पाहिजे होता.

मी दु:ख सांगितले तर बदनाम करायला लागले…

मी अश्रू पुसायला गेलो तर आग लावायला गेलो असं म्हटलं. त्याने काहीही करावे त्याला बोलायचे नाही. मी दु:ख सांगितले तर बदनाम करायला लागले. ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. सरकारी नोकरीत आकडेवारीनुसार, १ लाख ३० हजार जागांचा अनुशेष आहे. १० टक्के आरक्षण आर्थिक निकषावर आहे. त्यात कोण तर मराठा समाज, उरलेल्या ४० टक्क्यात मराठा समाज आणि आता आमच्या २७ टक्के आरक्षणातही मराठा समाज येतोय असं भुजबळांनी म्हटलं.

दरम्यान, मराठा समाज १५ टक्के आयएएस, आयपीएस २८ टक्के, फॉरेन सर्व्हिस १८ टक्के, मंत्रालयात अ – ३७.५ टक्के, ब – ५२.५ टक्के, क – ५२ टक्के आणि ड -५५ टक्के लोक आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाने ५१०५ कोटी रुपये वितरीत केले. १० टक्के आर्थिक निकषावर आरक्षण आहे त्यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमात ७८ टक्के मराठा समाज आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती २ लाख १३ हजार लाभार्थी आहेत. सारथी, मराठा महामंडळाला जे दिले ते महाज्योती आणि ओबीसी महामंडळाला द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली.

आमची लायकी काढतो…

आमची लायकी काढतो, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडे लायकी होती म्हणून स्वराज्यासाठी लढले. महात्मा फुलेंची लायकी होती त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवजयंती फुलेंनी सुरू केली. शाहीर अमर शेख यांनी दुसरा पोवाडा रचला, अण्णाभाऊ साठे यांनी तिसरा पोवाडा रचला. जे संविधान आम्ही मानतो, जे बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाचे त्यांची लायकी नव्हती…कुणाची लायकी काढताय? पेशवाईला लोळवणारे महार सैनिक यांच्याकडेही लायकी होती.

कपडे आमचा शिंपी शिवतो, तुमची शेतीची अवजारे सुतार बनवतो. वडार दगडावर घाव घालून पाटा वरवंटा तयार करतो, चप्पला चर्मकार बांधवांनी बांधली, घर बलुतेदारांनी बांधली आमची लायकी नाही? आज आमची लायकी काढली जाते अशा शब्दात भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं काम करायचे, उपनिरिक्षक मराठा समाजाचा, एसपी मागासवर्गीय त्याने आता उपनिरिक्षकाला सलाम ठोकायचा. आमची लायकी नाही. हे शिकवताय तुम्ही…त्यावर बोलायला कुणी तयार नाही.

गावबंदी करणारांना तुरुंगात टाका …

हे गावबंदी…गावागावांत बंदी, एकालाही सोडत नाही. आमदार नारायण कुचे, रावसाहेब पाटील दानवे सगळ्यांना गावबंदी करणार. रोहित पवार, राजेश टोपे सगळे आले त्यांचे स्वागत करणार..असा आरोप भुजबळांनी केला. गावबंदी केल्यावर संविधानानुसार १ महिन्याची शिक्षा आहे. सरकार, पोलीस करणार आहे की नाही? संविधानातील १९ कलम काय सांगतोय…कुणालाही बंदी करता येणार नाही…काढा बोर्ड आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना १ महिन्याच्या शिक्षेवर पाठवा अशी मागणी भुजबळांनी केली.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, माझी सर्वपक्षातील नेत्यांना विनंती आहे. अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवली जात नाही. त्याचा आत्मा जिवंत आहे ते स्वत:समर्थनात येतात. आपल्या अधिकारावर गदा येत असेल तर विरोध करायला हवा. नवीन निर्माण नेते आता बोलतंय, भुजबळ म्हातारा झालंय, सगळेच होणार आहेत. आमचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. जितके केस तितकी आंदोलने छगन भुजबळांनी केलीय. आंदोलन मला नवीन नाही. दोन्ही बाजूने तुम्ही आम्हाला अडचणी आणतायेत. एकाबाजूला कुणबी दाखले द्या, तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे हायकोर्टात जाऊन ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केलीय असं त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!