Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticaalUpdate : सेना आमदार आमदार अपात्रता प्रकरण : सुनावणी दरम्यान दोन्ही गटात मोठी खडाजंगी ….

Spread the love

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी  सुनावणी सुरुवात झालीय. ठाकरे-शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादाच्या दरम्यान मोठी खडाजंगी झाली असल्याचे . वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीका टिप्पणीवरअध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.

शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी उपस्थित आहेत. २४  तारखेपर्यंत शिंदे गटाला वेळ देण्यात आला आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे. ठाकरे गटाने आज कागदपत्रे  सादर केली. शिंदे गटाने मात्र कागदपत्रे   सादर करण्यास वेळ मागितला. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचे  वाचन केले. प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रे  ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली जात आहे. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे

दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले जात आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचा निर्वाळा अध्यक्ष नार्वेकरांनी दिला आहे. शिंदे यांनी पुराव्यांवर घेतलेले आक्षेप इथेच नोंदवले जावेत ते बंद दारामागे होऊ नये आणि अध्यक्षांनी त्यावर काय रुलिंग दिले  ते सुद्धा रेकॉर्डवर घ्यावे, अशी देखील माहणी कामत यांनी केली आहे.

मुंबई : आमदार अपात्रतेवरील पुढील सुनावणी आज मंगळवारपासून विधानसभाध्यक्षराहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप मिळाला नसल्याचा शिंदे गटाचा दावा आणि ठाकरे गटाने पुरावे सादर करण्यासाठी मागितलेली परवानगी, यावर विधानसभाध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष आहे.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत मला निर्णय द्यायचा आहे, असेही स्पष्ट केले होते.”मला लवकरात लवकर सुनावणी घ्यायची आहे. तुम्ही सर्व याचिका दाखल करुन वेळ का वाढवत आहात. १६ नोव्हेंबरपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाने यासंबंधी सर्व कागदपत्रे  जमा करावीत. मला ३१ डिसेंबरच्या आधी या प्रकरणावर सुनावणी घ्यायची आहे”, असे राहुल नार्वेकर म्हणाले होते. त्यामुळे ही सुनावणी २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु केला आहे. आजपासून पुढील सुनावणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात सुरू होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!