Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EmploymentNewsUpdate : मध्य रेल्वेला ‘टीसी’ ची कमतरता , सेवानिवृत्तांना सेवेत घेण्याच्या हालचाली …..

Spread the love

मुंबई : एकीकडे देशातील तरुण बेरोजगारीचा सामना करीत असून दुसरीकडे केंद्र आणि राज्याच्या अनेक कार्यालयात नोकऱ्यांची उपलब्धता आहे परंतु सरकार भारती न करता खासगीकरणावर अधिक भर देत आहे .  सध्या मध्य रेल्वेत  ३,९३५ टीसींची आवश्यकता आहे. परंतु सध्या ३,२६५ टीसी कार्यरत आहेत. इतर पदांसह एकूण ६८८ पदे रिक्त आहेत. टीसीची कमतरता दूर करण्यासाठी सेवानिवृत्त टीसीना सेवेत घेण्याची योजना पुन्हा सुरू करावी, अशी विनंती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी रेल्वे बोर्डाला केली आहे.

विशेष म्हणजे  मध्य रेल्वेने तिकीट तपासणीतून गेल्या वर्षी ३०३ कोटींचा मिळविला होता. भारतीय रेल्वेवरील तो विक्रम होता. सध्या रिक्त पदांमुळे तिकीट निरीक्षण तीव्र करणे, प्रवासी सेवा वाढवणे, वाढीव तिकीट विक्रीद्वारे महसूल वाढविणे यास अडचणी येतात त्यामुळे रिक्त पदे हे सेवानिवृत्त टीसींना सेवेत घेऊन करावी, अशी मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी रेल्वे बोर्डाला केली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना सीआरएमएस महामंत्री प्रवीण वाजपेयी यांनी म्हटले आहे की , मध्य रेल्वेच्या टीसीवर कर्मचाऱ्यांवर ताण कमी करण्यासाठी निवृत्त टीसींची भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे. ती काहीकाळापर्यंत ठीक आहे. परंतु भरतीद्वारे कायमस्वरूपी टीसी घेण्यास प्राधान्य द्यायला हवे.

टीसीमुळे गाड्यांचे व्यवस्थापन चांगल्यारीतीने करता येईल आणि चांगली प्रवासी सेवा प्रदान केली जाईल आणि तक्रारी कमी करणे शक्य होईल. महाराष्ट्र पोलिस महासंचालकांनी प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये तिकीट तपासणी तीव्र करण्यावरही भर दिला आहे. कारण अटक केलेल्या गुन्हेगारांपैकी ८० ते ९० टक्के गुन्हेगार हे विनातिकीट होते. आहे. यामुळे प्रवाशांसाठी विशेषतः महिलांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!