Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CourtNewsUpdate : डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलन विरोधी याचिकेत काय म्हटले आहे ?

Spread the love

मुंबई: मराठा आरक्षण विरोधी वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ८ नोव्हेंबरला याचसंदर्भातील अन्य याचिकांसोबत सुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आला आहे. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव,पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,मुंबई पोलीस आयुक्त,भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक जालना,गोंडीचे पोलीस निरीक्षक,सीबीआय महासंचालक, राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांना याचिकेत प्रतिवादी केलेले  आहे.

आपल्या २१६ पानी दाखल याचिकेत सदावर्तेंनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र अशांत करून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरु आह. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा जरांगेंच्या आंदोलनापाठी असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे.

या याचिकेत सदावर्ते यांनी म्हटले आहे कि , महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन म्हणजेच एसटी महामंडळाच्या अनेक बसेसचे मोठे नुकसान राज्यभर जाळपोळ करून करण्यात आले आहे. सदर कर्मचा-यांना त्या दिवसांचा पगारही मिळालेला नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय आणि इतर आस्थापनांवर या हिंसेचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी जबरदस्तीने बंद करण्यात आले जीडीपीचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रात दळणवळणावर परिणाम झाला. गंभीर स्वरूपाचे दाखल गुन्हे मागे घ्या ही सुद्धा अनिष्ट मागणी करण्यात आली. या गोष्टी लक्षात घेता मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांकडून वसुली करण्यात आलेली नाही. त्यासोबतच ३०७ सारखे गुन्हे जे गंभीर अपराधाचे आहेत. सदर गुन्हे वापस घेण्याचे अधिकार सरकारला देखील नाहीत. त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने देखील अनेक वेळेस अशा गंभीर अपराधातील लोकांविरुद्ध कारवाई न करण्याबाबत निरीक्षण नोंदवलेली आहेत.

आंदोलक संवैधानिक मागणी करत नाहीत …

सदर आंदोलक संवैधानिक मागणी करत नसून, मराठा समाजाला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मागास समजले नाही, त्यावेळेस पुन्हा एकदा कायद्याचा भंग करत, लोकांना एकत्रित जमवून आंदोलन करणे हे गैर असून महाराष्ट्रा मध्ये तेढ निर्माण करणे, हिंसाचार घडवण्याकरिता जवाबदार असणे, महाराष्ट्राला अशांत करणे, जातीय तेढ निर्माण करणे, ही पार्श्व भूमी लक्षात घेता जरांगे पाटील हे त्यांच्या साथीदारांसह मिळून पाठराखे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसाच प्रयत्न करत असल्याचे पुन्हा दिसते.अद्याप मागील गंभीर गुन्ह्याबाबत जरांगे पाटील आणि त्यांच्या साथीदारांकडून नाहक त्रास सोसणाऱ्या लोकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, तसेच पोलीस अधिका-यांना नाहक प्रशासकीय कार्यवाहीला राजकीय कारणाने समोर जावे लागले. त्या दिवशीच्या रोजगाराचे पैसे कष्टकऱ्यांना मिळाले नाही आणि व्यावसायिक आस्थापनांना देखील आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सदर झळही संपूर्ण महाराष्ट्रात सोसावी लागली.

तरी आपणास विनंती आहे की दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ पासून जे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन किंवा जमाव जमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मागील पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्राला अशांत करण्याचा हेतू आहे सदर हेतू स्वच्छ नसून काही राजकीय पक्षाच्या लोकांनी मिळून महाराष्ट्राला डिस्टर्ब केल्याचे स्पष्ट आहे. तेव्हा महाराष्ट्रात पुन्हा गाड्यांची तोडफोड जाळपोळ सरकारी मालमत्तांचे नुकसान होऊ नये, हे पाहता मनोज जरांगे पाटील यांना १४ नोव्हेंबर २०२३ पासून कोणतीही असविधानिक आंदोलन करण्यास सहभाग घेण्यास मुभा देण्यात येऊ नये. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना मा. जुडीशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडून योग्य तो आदेश घेऊन पाव बंद करण्यात यावे गरज पडल्यास अटक करण्यात यावी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!