Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : वाघ नखावरून वादविवाद सरकारची तयारी तर इतिहासकाराचे प्रश्न …

Spread the love

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार मारण्यासाठी वापरलेली वाघनखं ही लंडनवरुन परत आणणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. नोव्हेंबरमध्ये ही वाघनखं भारतात येणार आहे. शिवरायांच्या वाघ नखांवरून सध्या मोठा वाद सुरू असताना शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना ते  म्हणाले की , “मला काही त्यातलं ज्ञान नाही. मात्र, इंद्रजीत सावंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहेत. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत   वेगळं मत आहे हे मी टीव्हीवर पाहिलं पण असं असलं तरी मला प्रत्यक्षात त्याबाबत माहिती नाही. तसेच त्याबाबत वाद निर्माण करावा असं मला वाटत नाही.”

दरम्यान सरकारने याबाबत पूर्ण तयारी केली असून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः सोन्याचं नक्षीकाम केलेला ड्रेस घालून वाघनखं आणायला जाणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘आमच्या शिवबाची कीर्ती लंडनपर्यंत आहे. तिथे अनेक शिवभक्त आमच्या कार्यक्रमात फेटे बांधून यात्रा करणार आहेत. हे कळलं तेव्हा मला फार आनंद झाला. एक पुण्याचा शिवभक्त आहे, तो माझ्यासाठी विशेष पोशाख बनवित आहे. हा पोशाख घालून तुम्ही गेलं पाहिजे असा आग्रह त्याचा आहे. साठीत जाणाऱ्या एका शिवभक्ताचं प्रेम बघून मी भारावलो आहे’.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार संग्रहालयाता हे मौल्यवान शस्त्रं सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी ठेवले जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

जनतेची दिशाभूल करू नका …

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही शिवरायांची खरी वाघनखे आहेत का? त्यांनी खरंच ती वाघनखं वापरली होती का? असे सवाल उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी देखील सरकारच्या वाघनखासंदर्भातील दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही वाघनखे शिवछत्रपतींनी वापरलेली नसून सरकारने जनतेची दिशाभूल करू नये असे म्हटले आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केलेले प्रश्न

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात इतिहासाचा उलगडा करत अनेक प्रश्न उपस्थित केले असून अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. मात्र आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं महाराष्ट्र शासन भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघनखं नाहीत हे स्पष्ट असल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे.

जर अफजलखानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे जर इ.स. १९१९ पर्यंत साताऱ्यात असलेल्या नोंदी आणि त्याचे छायाचित्र आहेत तर मग तर इ.स १९१९ च्या अगोदरच म्हणजे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जमा झालेली वाघनखे शिवछत्रपतींची असूच शकत नाही, असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे. त्यामुळे सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही परत आणतोय ही कथा रचली जात आहे. ती पुर्णपणे खोटी असून हे इतिहासाच्या आणि इतिहास लेखन शास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही, असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं.

आमच्यासारख्या संशोधकांनी त्याविषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिले आहेत. मात्र शासन नवीनच कुठला तरी शोध लावतंय आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असं सांगत आहे. ही जनतेची दिशाभूल करायची गोष्ट आहे. ती शासनाने थांबवावी आणि जर त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर शासनाने जनते समोर आणावेत, असे आव्हानच इंद्रजित सावंत यांनी सरकारला दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!