Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Wardha Bus Accident: खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात खासगी ट्रॅव्हल्स उलटली , एक ठार आठ जखमी

Spread the love

वर्धा : नागपूर – हैदराबाद महामार्गावर वर्ध्याच्या हिंगणघाट येथील छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर आठ जण यात जखमी झाले आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी की , सदर ट्रॅव्हल्स क्रमांक सी बी 19 – एफ 3366 ही हैदराबाद येथून रायपूरकडे जात होती. या ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करत होते तर प्रवाश्याच्या म्हणण्यानुसार प्रवाशांची संख्या पन्नासहून अधिक होती. दरम्यान ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक छोटी आर्वीजवळ पोहोचताच या महामार्गावर असलेल्या खड्डयांचा अंदाज न आल्याने खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली.

या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला तर तर ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात किरकोळ जखमी झालेले प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघून गेले. अपघाताचे वृत्त समजताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केले . अधिक तपस सुरु आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!