Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPNewsUpdate : पवार काका -पुतण्या आणि आपली बैठक झाल्याची जयंत पाटील यांची कबुली

Spread the love

मुंबई : एका उद्योजकाच्या घरी काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये गुप्त बैठक झाली असल्याच्या जोरदार चर्चा राज्यात चालू असताना त्याबद्दलची माहिती स्वतः राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे . पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, एका कंपनीच्या बाबतीत साक्ष म्हणून त्यांच्या भावाला बोलवण्यात आल्याचे देखील जयंत पाटील म्हणाले.

शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक झाली. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. जवळपास ४ तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जाते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. काका-पुतण्याच्या या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र आता या भेटीनंतर जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. भगतसिंग पाटील हे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आहेत. भगतसिंग पाटील यांच्यासोबत जयंत पाटलांच्या आणखी काही निकटवर्तीयांना नोटीस पाठवली आहे. ईडीच्या नोटीस मिळाल्यानंतर अनेकांनी सत्तेसोबत जुळवून घेतले आहे. याआधी हसन मुश्रीफांनाही ईडीची नोटीस आली होती. त्याचसह जयंत पाटील यांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. त्यात मुश्रीफांनी अजित पवारांसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जयंत पाटील यांचीही ईडी चौकशी झाली आहे. अलीकडेच अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा जयंत पाटील आणि शाह यांच्या बैठक झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर जयंत पाटलांसह राष्ट्रवादी नेत्यांनी याचा नकार दिला. त्यात शरद पवार-अजित पवार बैठकीवेळी जयंत पाटीलही हजर होते. या तिन्ही नेत्यांच्या बैठकीत ईडी कारवाईबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर जयंत पाटलांच्या भावाला ईडीची नोटीस आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान मला या भेटीबद्दल काहीही माहिती नाही. तपशील नाही. भेट झाली, कधी झाली, किती वेळ झाली याबाबत काही माहिती नसल्याने मी तुमच्या ज्ञानात भर टाकू शकत नाही. मी त्याला सक्षम नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!