Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : धक्कादायक : एसआरपीएफ जावानाची रेल्वेबोगीत फायरिंग , चौघांचा मृत्यू

Spread the love

मुंबई : जयपूर- मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवासी आहेत. आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने सगळ्यांवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान घडली. मीरा रोड बोरिवली दरम्यान जीआरपी मुंबईच्या जवानांनी या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले.

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई ( गाडी क्र. १२९५६ ) ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन याने एएसआय टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

गोळीबार केल्यानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर आरपीएफ जवान चेतन गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता. यानंतर ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली असून, ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपी आरपीएफ जवान चेतनला भायंदर येथे अटक करण्यात आली आहे.

प्रवाशांमध्ये पसरला गोंधळ

जयपूर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक १२९५६) कोच क्रमांक बी ५ मध्ये ही घटना घडली. ही घटना आज पहाटे ५.२३ वाजता घडली. आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, कॉन्स्टेबल चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवासी प्रवाशांमध्ये गोंधळ पसरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ५.२३ वाजता, ट्रेन क्रमांक १२९५६ जयपूर एस मध्ये बी५ मध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली. ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे आणि ASI व्यतिरिक्त ३ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ डीएससी बीसीटी साइटवर येत आहेत. या जवानाला पकडण्यात आले आहे. डीसीपी उत्तर जीआरपीला माहिती देण्यात आली आहे.

पोलिस प्रवाशांचीही चौकशी करत असून, आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने हा गोळीबार का केला याची माहिती मिळालेली नाही. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस रेल्वेतील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आरोपी कॉन्स्टेबलला शस्त्रासह  घेतले ताब्यात

पश्चिम रेल्वेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्याने RPF ASI आणि इतर तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. आणि त्याने दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली. आरोपी कॉन्स्टेबलला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!