Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJP News Update : मुस्लिम वोट बँक काबीज करण्यासाठी भाजपची रणनीती, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी तारिक मन्सूर यांना संधी…

Spread the love

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या  पार्शवभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नवीन टीम जाहीर केली आहे. त्यामध्ये १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आठ राष्ट्रीय महासचिव नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भाजपने पसमांदा  मुस्लिम समाजाला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे आमदार तारिक मन्सूर यांना स्थान दिले आहे. तारिक मन्सूर हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.

तारिक मन्सूर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. १७ मे २०१७ रोजी त्यांनी हे पद स्वीकारले होते. मे २०२२ पर्यंत त्यांचा कार्यकाल होता, परंतु कोरोनामुळे त्यांचा कार्यकाळ सरकारने एक वर्षासाठी वाढवला होता. राष्ट्रीय स्वंसेवक संघाशी त्यांची जवळीक असल्याने त्यांना पुन्हा कुलगुरूपदी ठेवण्यापेक्षा भाजपने त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊन विधान परिषदेचे सदस्यत्व बहाल केले.

मन्सूर हे AMU चे पहिले कुलगुरू होते ज्यांना विधान परिषदेचे आमदार होण्याची संधी मिळाली. याशिवाय ते जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्यही राहिले आहेत. मन्सूर यांनी एएमयूमधील शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुखाचीही जबाबदारी सांभाळली आहे.

तारिक मन्सूर यांच्या मदतीने बड्या मुस्लिम समाजाला डावलून सर्व सामान्य मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा मनसुबा असून मुस्लिमांना ते भाजपशी जोडू शकतात असा भाजप नेतृत्वाला विश्वास आहे. या निमित्ताने प्रोफेसर तारिक मन्सूर यांच्या मदतीने भाजप उत्तर प्रदेशातील मुस्लिम व्होट बँकेला मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागांपैकी २९ जागा मुस्लिम बहुल आहेत आणि हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. यापैकी बहुतेक सहारनपूर, मेरठ, कैराना, बिजनौर, अमरोहा, मुरादाबाद, रामपूर, संभल, बुलंदशहर, अलीगढ पश्चिम उत्तर प्रदेशात येतात. यापैकी सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, नगीना या जागा भाजपसाठी सोप्या नाहीत. यातील रामपूर पोटनिवडणुकीत भाजपने मिळवली आहे. आता तारिक मन्सूर यांच्या माध्यमातून भाजप मुस्लिम व्होट बँकेसाठी तारिक यांचा किती फायदा होईल हे सांगणे कठीण आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!