Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Raigad Landslide | धक्कादायक, रायगड येथे आदिवासी पाड्यावर कोसळली दरड… १०० जण अद्याप बेपत्ता

Spread the love

रायगड मधील इर्शालवडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत २०० ते २५० लोकसंख्या असलेल्या गावावर रात्री दरड कोसळली असून, सुमारे ४० ते ५० घर मलब्या खाली गेल्याचे वृत्त आहे.

आत्तपर्यंत या ढीगार्याखली अडकलेल्या २५ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० जण अद्याप पेपत्ता आहेत.

घटनास्थळी अजूनही पाऊस असल्यामुळे एनडीआरएफच्या बचाव पथकांना मदत कार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान रायगड येथील घटनास्थळी जात असताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी पोहोचण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणात असलेले धुकं बाधा ठरत आहे.

एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून रेस्क्यूसाठी पनवेल महापालिकेचे कर्मचारीही दाखल झाले आहेत व बचाव कार्य सुरू आहे. बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी हायवे पासून आतील रस्ता पोलिसांकडून बंद ठेवण्यात आला आहे.

इर्शालवडी हा अधीवसी पडा असून डोंगराच्या उतारावर आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भिसे, गिरीश महाजन व विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

विधानसभा पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महत्त्वाची माहिती…

विधानसभेतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की घटनेनंतर एनडीआरएफचे चार पथक बचाव कार्यासाठी  रायगड इर्शालवडी येथे दाखल झाले आहे. याशिवाय मुंबई आणि पनवेल वरूनही तीन बचाव पथक इर्षाळवाडीत दाखल झाली आहे.

या गावात दरड कोसळली परंतु हा भाग दरड प्रवण क्षेत्रात नव्हता, तरीही तिथे दरड कोसळल्याने चिंता व्यक्त केली जातेय असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान ते म्हणाले की भूस्खलनाचे स्पॉट बदलत असल्याने जे दरड प्रवण क्षेत्र आहेत तिथे दुर्घटना होत नाहीत. जे यादीत नसतात तिथे दुर्घटना होते. सध्या हवामानाचा पॅटर्न बदलल्याने कमी दिवसात जास्त पाऊस पाहायला मिळतोय पावसाची टक्केवारी समानच असते परंतु जो पाऊस महिना सव्वा महिन्यात पडायचा तो पाऊस एक-दीड-तीन दिवसात पडतोय.

या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात देण्यात आला होता व टीम तैनात ठेवण्यात आले होत्या परंतु प्रत्येक गोष्टींचा अंदाज घेणं कठीण जातं मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनेमधून प्रशासनाला शिकायला मिळतं असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

अशा प्रकारचे स्पॉट आणखी कुठे आहेत हे शोधावं लागेल, तिथे लोकांचं स्थलांतर करावं लागेल. परंतु स्थलांतर कारण सोप्पं नसतं. नागरिकांची मानसिकता नसते कारण तिथे त्यांची उपजीविक असते. कोकणात त्यांचे देवदैवता तिथे असतात त्यामुळे स्थलांतर करणं सोपं नसतं, पण असे स्पॉट दिसल्यास शक्तीने स्थलांतरण करण्याची भूमिका शासनाला स्वीकारावी लागेल असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

• Live : विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या ताज्या घडामोडी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!