Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : राष्ट्रवादीचे बंडखोर शरद पवारांच्या भेटीला , पवारांची कुठलीही प्रतीक्रिया नाही …

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी आणि शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी मीडीयाशी बोलताना शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि पक्ष एकसंध रहावा म्हणून विचार करावा असे आम्ही त्यांना सांगितले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान यावर शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

गेल्या १५ दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी बंड करून शिंदे – फडणवीस गटाच्या सरकारमध्ये जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. या दरम्यान अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता. इतकेच नव्हे तर आपले फोटो अजित पवार यांच्या फुटीर गटाने वापरू नयेत असेही शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र इतके सगळे होऊनही अजित पवार यांच्या गटाने आज पुन्हा शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्याला आशिर्वाद द्यावा याचा पुनरुच्चार केला आहे.

दरम्यान शरद पवारांना भेटण्यापूर्वी अजित पवार गट देवगिरी वर एकत्र भेटले होते. त्यानंतर पूर्वसूचना न देता वाय बी चव्हाण सेंटर वर शरद पवारांच्या भेटीला पोहचले. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेमध्ये सहभागी होताना 9 एनसीपी आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे. शरद पवार यांच्या भेटीला पोहचलेल्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवळ, संजय बनसोड, हसन मुश्रीफ यांचा समावेश होता.

आपल्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्यात वावगं काही नाही : आशिष शेलार

दरम्यान यावर आपली प्रतिक्रिया देताना, अजित पवार गट आजही शरद पवारांना आपला नेता मानतात. आपल्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्यात वावगं काही नाही, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्षांची बैठक सुरू होती तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा मला फोन आला, त्यांनी मला वाय बी चव्हाण सेंटरला यायला सांगितलं. या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेले नऊ नेते हे सर्व उपस्थित होते. त्यांनी शरद पवार साहेब यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. यावेळी त्यांनी यावर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आता ते येऊन भेटले हे अनपेक्षित आहे. शरद पवार यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा यावर चर्चा होईल. त्या नऊ मंत्र्यांनी पवार साहेबांच्याकडे खंत व्यक्त करुन दिलगीरी व्यक्त केली. लार्जर इटरेस्ट ठेऊन सगळ्यांना एकत्र कराव अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नाही.

देवेंद्र फडणवीस यांची प्रातिक्रिया

अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला या भेटीची कल्पना नाही, पण त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. शरद पवार हे त्यांचे वर्षानुवर्षे नेते राहिलेले आहेत. त्यामुळे या भेटीत मला काही वावगं आहे असं वाटत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!