Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CourtNewsUpdate : मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणीची तारीख ठरली …

Spread the love

नवी दिल्ली :लांबणीवर पडलेल्या बहुचर्चित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रलांबीत निवडणुकांच्या बाबतीत दाखल असलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सुनावणीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. १० एप्रिल नंतर आता या प्रकरणावर आता १८ जुलै दिवशी सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्याची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश त्रिसदस्यीय खंडपीठासह याप्रकरणी पुढील सुनावणी करणार आहेत.

सध्या महाराष्ट्रामध्ये २५ पेक्षा अधिक महापालिका, २०७ नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षण , वेळोवेळी जाहीर केलेले अध्यादेश, शिंदे फडणवीस सरकारने नव्याने प्रभागरचना करण्यासंदर्भातील जारी केलेले अध्यादेश या सगळ्यांवर १८ जुलै रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रात कोविड संकटादरम्यान अनेक महानगरपालिकांचा कार्यकाळ संपला त्यानंतर दीड दोन वर्ष प्रशासकाच्या हातात मुंबई, पुणे, नाशिक महानगरपालिकांचा कारभार देण्यात आला आहे. आता हा कारभार पुन्हा नगरसेवक आणि महापौरांच्या हातात देण्यासाठी निवडणूका आवश्यक आहेत. त्यामुळे अनेक महानगरांमध्ये पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे. दरम्यान पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात या पालिका निवडणूकांचे पडघम वाजू शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!