Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GSTNewsUpdate : जीएसटी चोरांची आता खैर नाही , होऊ शकते ईडीची कारवाई

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी चोरीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे, यामुळे आता जीएसटी घोटाळ्यांना चाप बसेल. सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) आणण्याचा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जीएसटी चोरी करणाऱ्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला कारवाई करता येणार आहे.

यासंदर्भात सरकारने महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता जीएसटी चोरी करणाऱ्यांवर ईडीचा धाक असेल. जीएसटी चोरीच्या प्रकरणांमध्ये ईडीला थेट हस्तक्षेप करता येणार आहे.

सरकारच्या नव्या निर्णयामुळे जीएसटी चोरी करणारे व्यक्ती किंवा कंपनीवर ईडीला थेट कारवाई करण्याचा अधिकार असेल. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, जीएसटी नेटवर्कच्या माहितीसंबंधित सर्व सूचना अंमलबजावणी संचालनालयाला देण्यात येतील. या अधिसुचनेनुसार, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कलम ६६ (१) (iii) अंतर्गत ईडी आणि जीएसटीएन मधील माहितीची देवाणघेवाण करण्यासंबंधी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!