Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. चंगोले यांची ज्ञानप्राप्त करण्याची अभिलाषा भावी पिढीसाठी प्रेरणादायी : डॉ. आ.ह साळुंखे

Spread the love

“अन्याय, अत्याचार विरोधात संघर्ष करण्याचे शिकविणारे फुले, शाहू आणि आंबेडकर हे नुसते व्यक्ती व महापुरुषचं राहिले नाही तर हे विचार झाले असून हेच आता प्रत्येकाने आत्मसात करावे, डॉ.चंगोले यांनी चळवळीसाठी आपले आयुष्य घालवले, प्रबोधन शिबीर आणि सत्यशोधक मासिकातून त्यानी कार्यकर्त्यामध्ये समाजात काम करण्याची उर्जा टिकवून ठेवली. त्यांच्या मध्ये ज्ञानप्राप्तीसाठी असलेली अभिलाषा ही भावी पिढीसाठी प्रेरणा देणारी आहे, असे मत थोर विचारवंत  डॉ. आ.ह साळुंखे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शाहू महाराज यांचा १४९ व्या जयंतीनिमित्त संत रविदास सत्यशोधक समाज आयोजित सत्यशोधक प्रबोधनकार प्रा.डॉ. पी. एस. चंगोले प्रबोधन ग्रंथाचा लोकार्पण सोहळा नुकताच निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात पार पडला. या सोहळ्यात दुरदृश्य प्रणाली द्वारे मा.म. देशमुख, डॉ. आ.ह साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवारयांनी ग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आपले मते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. जिल्हा न्यायाधीश डी. आर. शेळके यांनी आपले विचार मांडले. प्रकाशन सोहळा कार्यक्रमास सत्यशोधक ग्रंथाचे प्रबोधनकार व नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज चे मा.प्राचार्य डॉ. चंगोले म्हणाले, छ. राजर्षी शाहू महाराज यांचा १४९ जयंतीउत्सवाचे औचित्य साधून प्रबोधन ग्रंथाचा लोकार्पण सोहोळा छ. संभाजीनगर शहरात होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
राजर्षी शाहू महारांनी२६ जुलै१९०२ रोजी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये ब्राह्मण, पारशी, जनभी आणि कायस्थ या ४ जाती तेव्हाच्या हिंदू समाज रचनेतील पुढारलेल्या, पुढे गेलेल्या जाती होत्या.

उरलेल्या समस्त जातींतील नागरिकांना मागासवर्गीय या कॅटेगरीत टाकण्याची घोषणा राजर्षी शाहू महाराजांनी केली. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक चळवळ सुरू करताना या देशातील जातीव्यवस्थेमुळे जे लोक सोबत जेवण करणेही कमी पनाचे मानायचे उदा. माळी समाज हा शिंपी समाजाला जवळ बसणे कमीपणाचे मानायचा, मराठा समाज हा कुणबी समाजाला आपल्यापेक्षा कमी मानायचा, जैन समाज हा न्हावी समाजाला कमी मानायचा, अशी समाजव्यवस्था असतांना शाहू महाराजांनी जातीनिहाय वसतिगृहाची निर्मिती केली.

शाहू महाराजांनी २१ जातींसाठी वसतिगृह स्थापन करतांना त्या त्या जातीतील कार्यकर्त्यांच्या संचालक मंडळाची नेमणूक केली तसेच सरकारी अनुदान देऊन वसतिगृहाची चळवळ गतिमान केली”.

तसेच ३० मे १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली कस्तुरचंद पार्क येथे एक परिषद आयोजित केली. यावेळी बहिष्कृत समाजाला शाहू महाराजांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर तुमचे नेते आहेत, ते आज नाही तर उद्या तुमच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्याशिवाय राहणार नाही किंबहुना ते देशाचे मोठे पुढारी म्हणून उदयास येतील, ही जी भविष्यवाणी(भाकीत) शाहू महाराजांनी त्यावेळी वर्तविले ते बाबासाहेबांनी खरे करुन दाखवले. म्हणूनच शाहू महाराजांच्या अनेक समाजोपयोगी कार्याची महती पाहता त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते,असे चंगोले यांनी नमूद केले.

यावेळी प्रथम शाहीर यशवंत जाधव व मंडळींनी , वाहतो झरा संत तुकोबांच्या वाणींचा तसेच राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह इतर महापुरुषांवर पोवाडे सादर केले .सत्यशोधक समाजाचे राज्याचे अध्यक्ष ग. मा. पिंजरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्थाविक केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनं सी.एम. रमणे यांनी केले.

या कार्यक्रमास श्री. संतोषराव लोखंडे, मा. जिल्हा माहिती अधिकारी शंकरराव बावस्कर, श्री. महादेव डांबरे, रमेश डोंगरे, हिरालाल काठोटे,अशोक वाढई, बी. सी. वाडेकर,अशोक डांगे, भगवान बावस्कर, बी.बी.जाधव, गजानन गव्हाळे, प्रल्हाद पद्मने, गजानन काटकर, ब्रिजलाल बंसवाल,नथु मेहेर, विजय शेळके, मा. नगरसेविका ज्योतीताई पिंजरकर,मीनाक्षी रमणे यांनी सहकार्य केले तर राज्यातील विविध जिल्ह्यांतून अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने मा.कार्यकारी अभियंता( म. न. पा)( एस. डी.पानझडे, आरोग्य उपसंचालक डॉ. शिवाजीराव धनवले, शा. वैद्यकीय महाविद्यालयाचे मा. अधिष्टाता डॉ. के. एस. भोपळे, प्रा. रामदास वनारे, रमेश गोरमे, गणेश पानझडे,स्वप्नील रमणे, सुधीर बोन्डेकर,डी. एस. म्हसके, इंजि. अनिल निंभोरे, डी. टी. शिपणे इत्यादी उपस्थित होते.

चंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मी व मुस्लीम समाजाची धारावीत निदर्शने आजाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!