Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हृदयद्रावक : मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नाही म्हणून विवाहितेची मुलीसह आत्महत्या….

Spread the love

लातूर : आपल्या मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक   घटना लातूरमध्ये घडली असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . भाग्यश्री व्यंकट हालसे असे  आईचे नाव असून तिने मुलगी समीक्षा हिच्यासह विहिरीत उडी मारून जीवन संपवले असल्याचे वृत्त आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळेगाव येथे  व्यंकट हालसे हे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत राहतात. दीड एकर शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना दोन्ही मुलांना इंग्रजी शाळेत घालणे शक्य नव्हते . तर दुसरीकडे व्यंकट यांची पत्नी भाग्यश्री यांना मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावे असे  वाटत होते. त्यासाठी त्यांनी पतीकडे मुलांना सीबीएसई शाळेत पाठवण्याची विनंती केली परंतु पतीला ते शक्य वाटत नव्हते .

पती व्यंकट यांनी पत्नी भाग्यश्रीची अनेकदा समजूत काढली. पण मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नसल्याणने पत्नी निराश होती तर पती हताश !!  शेवटी मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री यांनी मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिथून पतीला फोन करून मुलीचे  शेवटचे  तोंड पाहा म्हटले आणि विहिरीत उडी घेतली.

दरम्यान भाग्यश्री हालसे या मुलीसोबत आत्महत्या करण्यासाठी जात असताना मुलगा बाहेरच खेळत होता. त्यालाही घेऊन त्या निघाल्या होत्या. मात्र खेळण्यासाठी मुलगा सार्थकने हात सोडवून घेत तिथून पळ काढला आणि तो खेळायला गेल्याने वाचला.

भाग्यश्री यांच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार , भाग्यश्री  गेल्या वर्षभरापासून आईचे निधन झाले तेव्हापासून सतत दु:खी होती . आईच्या आठवणीतही ती सतत रडत असायची त्यात पुन्हा मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नाही हे शल्य होते. त्यातून तिने मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!