Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JalnaNewsUpdate : अपघाताचा बनाव करून पत्नीला पेटवणाऱ्या पाटील पोलीस कोठडी

Spread the love

जालना : मूलबाळ होत नाही आणि घटस्फोट देत नाही या कारणावरून अपघातात कारला आग लागल्याचा बनाव करून ‎ पत्नीला जिवंत जाळल्याप्रकरणी‎ पतीविरुद्ध २८ जून रोजी रात्री उशिरा‎ मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे. अमोल सोळंके‎ (काऱ्हाळा, ता. परतूर) असे आरोपी‎ पतीचे नाव आहे. २९ जून रोजी या‎ आरोपीला न्यायालयात हजर केले‎ असता त्याला पाच दिवसांची पोलिस‎ कोठडी सुनावण्यात आली.

तळणी – मंठा रोडवर २४ जून रोजी एका टेम्पोने कारला धडक दिली.‎ अपघात झाल्यानंतर अमोल सोळंके‎ हा वाहनचालकाला बोलण्यासाठी‎ गेला असता, कार लॉक होऊन‎ अचानक आग लागली. या आगीत‎ पत्नी सविता सोळंके (३०) हिचा‎ मृत्यू झाला असा बनाव केला, परंतु‎ हा अपघात नसून घातपात‎ असल्याचा संशय आल्याने मृत‎ विवाहितेचा भाऊ बळीराम जाधव‎ (स्वामी विवेकानंदनगर,‎ ‎ माजलगाव, जि. बीड) यांनी‎ दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे. या‎ प्रकरणात पोलिसांनी अमोल सोळुंके‎ याला ताब्यात घेऊन शुक्रवारी‎ न्यायालयात हजर केले असता, पाच‎ दिवसांचा पीसीआर सुनावण्यात‎ आला आहे.‎

आपलं सरकार

Click to listen highlighted text!