Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : बहुचर्चित आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा नोकरीला जय महाराष्ट्र्र !!

Spread the love

छत्रपती संभाजीनगर: धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज शासनाने आज मंजूर झाला आहे.

गेल्या महिन्यात विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी गेल्या दोन हंगामात १० हजार एकरी मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाला होता अशी चर्चा आहे. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती.

आपल्या साध्या राहणीमानासाठी सुनील केंद्रेकर नेहमी चर्चेत असायचे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते. कोरोनाकाळात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय होते . शहराच्या गल्ली बोलत जाऊन त्यांनी आरोग्यविषयक जागृती केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!