Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

FireNewsUpdate: मोठी बातमी : गंगामाई कारखान्यास भीषण आग, 70 कामगार अडकल्याची भीती…

Spread the love

अहमदनगर  : शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. इथेनॉलच्या टाकीला आग लागून झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या आगीत ७० हून अधिक कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार शेवगाव तालुका तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल डेपोला आग लागली. यात चार टाक्यांचा स्फोट झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप अनेक कामगार अडकल्याची शक्यता आहे. बचावकार्य जोरात सुरू असून अहमदनगर, औरंगाबाद, शेवगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या किती लोकांचा मृत्यू झाला सांगता येत नाही.कारखान्यात १५० कामगार काम करत होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे आकाशात धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!