HingoliNewsUpdate : महाशिवरात्री निमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविक भक्तांची तोबा गर्दी…

औंढा नागनाथ/ प्रभू नांगरे : भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आठवे ज्योतिर्लिंग म्हणून नागनाथ मंदिर जगप्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्त औंढा नागनाथ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लॉक डाऊन नंतर शिवप्रेमी व भाव भक्तांची या ठिकाणी प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा पहावयास मिळत आहेत. मंदिरावरची विद्युत रोषणाई हे यात्रेकरूंचे आकर्षण ठरत आहे.
यावर्षी औंढा नागनाथ चे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले व कळमनुरी विधान सभेचे आमदार श्री संतोष बांगर यांनी अधिकारीकरित्या संयुक्त पूजा आरती करून नागनाथाचे दर्शन घेतले आहे .त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे .कोणतीही अप्रिय घटना किंवा अनुसूचित प्रकार घडू नये याकडे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी करडी नजर ठेवलेली आहे. यात्रेकरू भाविक भक्तांना पोलिस निरीक्षक श्री विश्वनाथ झुंजारे यांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले आहे.