अंदोलनामागे वैयक्तिक अजेंडा… भारतीय कुस्ती महासंघाने सर्व आरोप फेटाळले

भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) त्याचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसह सर्व आरोप फेटाळून लावले आहेत दम्यान क्रीडा संस्थेमध्ये मनमानी आणि गैरव्यवस्थापनाला वाव नाही. कुस्तीपटू बदनामी करत असून यामागे त्यांचा काही वैयक्तिक अजेंडा आहे त्यामुळे ते आंदोलन करत आहेत. असे प्रतिउत्तर आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
भारतीय कुस्तीपटू अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेता विनेश फोगट यांच्यासह ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांचे जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरु होते. खेळाडूंना त्यांच्या तक्रारी सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर सध्या धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर खेळाडू सातत्याने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
काय आहे प्रकरण?
विश्व चॅम्पियनशिप पदक विजेती आणि ऑलिम्पियन विनेश फोगट यांनी बुधवारी (११ जानेवारी) भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच असा दावा केला होता की लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरातील अनेक प्रशिक्षकांनी महिला कुस्तीपटूंचे शोषण केले आहे. दरम्यान ब्रिजभूषण यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
चौकशीसाठी समिती नेमली
ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (WFI) ने शुक्रवारी (२० जानेवारी) भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे ज्यात, मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त आणि सहदेव यादव पॅनेलवर असतील.
औरंगाबाद महापालिकेतील १७८ महत्त्वाची पदे भरण्याचा निर्णय
#Mahanayak #MahanayakOnline #Gallitedilli #GalliteDelhi #Currentnewsupdate #WFISexualHarassment
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055