पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला आहे. आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. २०१३ मध्ये जहागीरदारला अटक करण्यात आली होती २०२० मध्ये पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आता जामीन मंजूर झाला आहे.
२०१३ मध्ये जहागीरदारला अटक करण्यात आली होती. १ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांना हायकोर्टाने त्याला पहिल्यांदा जामीन मंजूर केला होता. मात्र २०१९ मध्ये जामिनातील अटींचे उल्लंघन केल्याबद्दल एटीएसच्या विनंतीवरुन जहागीरदारचा जामीन हायकोर्टाने रद्द केला होता. त्यानंतर जहागीरदारने २०२० मध्ये पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्याला आता जामीन मंजूर झाला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार, अशी त्यांची नावे होती. भारतीय दंड संहिता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, MCOCA स्फोटक पदार्थ कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यातील जंगली महाराज रोडवर पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील पाच ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील पहिला बॉम्ब बालगंधर्व रंगमंदिराजवळ ठेवण्यात आला होता. त्यानंतर मॅकडोनाल्ड कॅफे, देना बँक, गरवारे पूल या ठिकाणीदेखील बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र बॉम्ब बनवण्यात त्रुटी राहिल्याने पुण्यात मोठी जीवितहानी टळली होती. त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले होते तर एक बॉम्ब फुटला नाही. मात्र डेक्कन परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. अनेकांना सुरुवातीला या स्फोटांचे गांभीर्य लक्षात आले नाही मात्र काही मिनिटांतच काही अंतरावर ठेवण्यात आलेले पाच बॉम्ब सलग फुटल्याने मोठा हल्ला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुण्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. स्फोट न झालेला बॉम्बही निकामी करण्यात आला होते.
धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
#Pune #PuneBoomblast #Blast #Maharashtra #Maharashtrapolitics #MahanayakOnline #MahanayakNews #NewsUpdate #CurrentNews
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055