Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवत आहे

Spread the love

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ शनिवारी राजधानी दिल्लीत पोहोचली. आज लाल किल्ल्यावर झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. देशाला खऱ्या मुद्द्यांपासून दूरठेवण्यासाठी भाजप सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवत आहे. राहुल गांधी असेही म्हणाले की, मी प्रवासात फक्त टी-शर्ट घालतो त्यामुळे मीडियाचे लोक मला विचारतात ते मला विचारतात की तुम्हाला थंडी वाजत नाही का? तुम्ही हि गोष्ट भारतातील शेतकरी, मजूर आणि गरीब मुलांना विचारतात का? असा सवाल विचारला आहे.

दरम्यान या यात्रे विषयी काँग्रेस खासदार देखील म्हणाले भारत जोडो यात्रा आणि हि भेट भारतात प्रेम आणि सद्भावना पसरवण्यासाठी आहे. भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. हा देश प्रेमाने एकत्र राहत आहे. या यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांना त्यांची जात, धर्म विचारला जात नाही. आम्ही सर्व मिळून पदयात्रा काढतो आणि लोकांना प्रेमाचा आणि आपुलकीचा संदेश देतो. येथे द्वेष किंवा हिंसा नाही. भाजप आणि आरएसएससोबत मीडियाचे लोकही द्वेष पसरवण्याचे काम करतात. हिंदू-मुस्लिम यांच्यात २४ तास द्वेष पसरवला जात आहे, मात्र, देशाचे वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. भाजप सरकार लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दे आणत असल्याचे ते म्हणाले. यात मोदीही काही करू शकणार नाहीत. ते ही परिस्थिती हाताळू शकत नाहीत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे, अशी घणाघाती टीका गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, जेव्हा कोणी तुमचा खिसा कापतो तेव्हा तो काय करतो? सर्वप्रथम तुमचे लक्ष विचलित करतो. जे काही केले जात आहे ते सर्व तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच केले जात आहे. ही गोष्ट ते २४ तास करतात आणि मग तुमचा खिसा कापला जातो. शेतकऱ्यांचा, मजुरांचा जो काही पैसा आहे तो थेट त्यांच्या मालकाच्या खिशात जातो. “हे पीएम मोदींचे नाही, तर अंबानी आणि अदानींचे सरकार आहे”. मी खरं सांगतोय विमानतळही त्यांचा, बंदरही त्यांचा, लाल किल्लाही त्यांचा. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्या त्यांच्या आहेत, रेल्वे त्यांच्या आहेत. ताजमहालही निघून जाईल. हे देशाचे वास्तव आहे. महामार्गही त्यांचे आहेत, सेलफोनही त्यांचे आहेत. पण सत्य आमचे आहे.

मी आतापर्यंत २,८०० किमी चाललो आहे. मला कुठेही द्वेष दिसला नाही, मला कुठेही हिंसा दिसली नाही. पण जेव्हा मी टीव्ही चालू करतो तेव्हा मला सगळीकडे हिंसा आणि द्वेष दिसतो. कारण त्यांना तुमचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असते. हे या देशात घडत आहे. तुमचे लक्ष कुठे जायला हवे?, सर्वप्रथम तुमचे लक्ष भारतातील तरुणांकडे वळले पाहिजे. आज भारतातील तरुण काय करतात, ते पकोडे बनवतात. बेरोजगारी का आली? छोटे व्यापारी जे छोटे व्यवसाय चालवतात त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. हे लोक देशाला रोजगार देतात. ते २४ तास गुंतलेले असतात. बँकेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतात. भारतातील दोन-तीन मोठ्या उद्योगपतींना १ लाख कोटी, ३ लाख कोटी दिले जातात. बँकेसमोरून छोट्या व्यावसायिकांना हाकलून लावले जाते. त्यानंतर पंतप्रधानांनी नोटाबंदी आणि चुकीचा जीएसटी लागू केला. हे धोरण नसून ते छोटे व्यापारी आणि शेतकरी यांना मारण्याचे हत्यार आहे. या कामातून देशातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. रोजगार देणाऱ्यांचा कणा तुम्ही मोडला आहे.

लक्ष हे योग्य ठिकाणी जायला हवे आहे. भाजप सरकार ने धर्माचा मुद्दा उपस्थित केला आहे. हिंदू धर्माबद्दल बोलूया, गरीब आणि दुर्बल लोकांना चिरडले पाहिजे, असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे. मी गीता, उपनिषदे वाचली आहेत. मात्र असे कुठेही वाचलेली नाहीत. हे लोक नेहमी भांडण लावण्याचे काम करतात.अशी टीका देखी राहुल गांधी यांनी केली आहे. ते आता देशात भीतीचे वातावरण पसरवत आहेत. शेतकऱ्यांची व्यथा पाहिली. भाजपच्या राजवटीत आम्हाला भीती वाटते, असे लोकांनी मला सांगितले. भगवान शिवाच्या चित्रात पसरलेल्या हाताला अभय मुद्रा म्हणतात, याचा अर्थ घाबरू नका, हिंदू धर्म म्हणतो घाबरू नका, हे लोक २४ तास या देशात भीती पसरवण्याचा प्रयत्न करतात. भाजपने माझी प्रतिमा नष्ट करण्यासाठी हजारो कोटी खर्च केले, पण मी अवघ्या एका महिन्यात देशाला सत्य दाखवून दिले आहे.

 

भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल, लाल किल्ल्यावर जाहीर सभा

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!