आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा म्हणतात, मग न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार?

विधान परिषदेत सीमावादावर ठराव मांडण्यात येणार असून त्यावर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात १८ मिनिटांच्या भाषणात शिंदे-फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार आसूड ओढले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सभागृहात सर्व सदस्यांचे एकमत झाले ही चांगली गोष्ट आहे. सीमाभाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडींचा अत्याचार थांबलाच पाहिजे. संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने हाती घेऊन पालकत्व करावे असा ठराव आजच्या आजच झाला पाहिजे अशी मागणी विधान परिषदेत आमदार उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अधिवेशनात, विधान परिषदेच्या सभागृहात बोललले आहेत. सीमाभागाचा लढा हा राजकीय नाही माणुसकीचा आहे, सांगतानाच विरोधक-सत्ताधाऱ्यांनी याप्रश्नी एकत्र येण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कर्नाटक हे भारताचे राज्य आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला बंधनकारक आहे मग कर्नाटकाला नाही का? तसेच, सीमावादावर सर्व पक्ष कर्नाटकात एकत्रित उभे राहतात ते चित्र आपल्याकडे का दिसत नाही. आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा असे म्हणतात मग न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार? अशा शब्दात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
सीमावादावर महाजन रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टची चिरफाड करणारे पुस्तक माजी मुख्यमंत्री डॉ. अंतुले यांनी लिहिले हते. सीमाभागातील मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न होतोय. या वादाकडे माणुसकी म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवर कधी अन्याय केला नाही. मात्र कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. खोटे गुन्हे दाखल करत आहेत. किती काळ आणखी लाठ्या काठ्या खायच्या? एक इंचही जागा कर्नाटकला देणार नाही अशी धमक आत्ताच्या सरकारमध्ये आहे का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि दिल्लीत एकाच पक्षाचे सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपला नेता मानतात. दिल्लीत मुख्यमंत्री गेले, गृहमंत्र्यांसमोर चर्चा केली. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आहे परिस्थिती तशीच आहे. मग परिस्थिती कुणी चिघळवली. बेळगावचे नामांतरण केले गेले. मराठीत पाटी लावली, मराठीत बोलले म्हणून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आले. केंद्र सरकार पालकत्व म्हणून वागतेय का? आपण काय करणार आहोत हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का? संजय राऊत चीनचे एजेंट हा शोध कर्नाटकने लावला. ६०-७० टक्के लोकसंख्या मराठी भाषिक असताना ती गावे कर्नाटकात टाकण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री जोरात बोलतायेत पण आमचे मुख्यमंत्री या विष्यवायर एक शब्दही बोलले नाहीत. जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित झाला पाहिजे हा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
सीमाभागाचा लढा हा राजकीय नाही. सीमावादावर मी एक पेन ड्राईव्ह देणार आहे. १९७० च्या दशकात एक फिल्म सीमा भागातील नागरिकांवर केली होती. अठराव्या शतकात त्याठिकाणी मराठी कशी वापरली जात होती. त्याचा उल्लेख आहे. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवा, असं आवाहन करतानाच विरोधी पक्षातल्याच लोकांकडे पेनड्राईव्ह असायचा, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055