भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल, लाल किल्ल्यावर जाहीर सभा

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू असणारी भारत जोडो यात्रेचा १८०वा दिवस असून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रा सकाळी साडेदहा वाजता आश्रम चौकाजवळ पोहचली असून दुपारी साडेचार वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर पोहचणार आहे. दरम्यान, दिल्ली काँग्रेसने भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मास्क घालून येण्याचे निर्देश दिले आहेत.
राहुल गांधींच्या या दौऱ्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेतील गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनीही लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. हरियाणातील फरिदाबाद येथील NHPC मेट्रो स्टेशनपासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. भारत जोडो यात्रा संध्याकाळी साडेचार वाजता लाल किल्ल्यावर पोहोचणार आहे. इथूनच राहुल गांधी भाषण करणार आहेत. सर्वसामान्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह काही सिनेकलाकारही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आज प्रसिद्ध अभिनेते कमल हसन भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी होणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी राजघाट आणि शांती स्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण करणार आहेत.
भारत जोडो यात्रेत सहभागी लोक दुपारी आश्रम चौकाजवळील धर्मशाळेत जेवण आणि विश्रांती घेतील. त्यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, इंडिया गेट सर्कल, आयटीओ, दिल्ली कॅंट, दर्यागंज मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते राजघाट, वीरभूमी, शक्तीस्थळ आणि शांती वन येथे पोहोचून श्रद्धांजली वाहणार आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हणले आहे की, त्यांचा पक्ष सरकारने जारी केलेल्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करेल. भाजप कोविडचे राजकारण करत असून भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, दिल्ली काँग्रेसने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि यात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना मास्क घालून येण्याच्या सूचना दिल्या आहेत.
धक्कादायक : बसमध्ये पत्नीची हत्या करून पती मृतदेहाजवळ बसून राहिला…
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055