२० वर्षीय तुनिषाने मालिकेच्या सेटवरच केली आत्महत्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. तिने मालिकेच्या सेटवर पंख्याला गळफास लावून जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून तिच्या आत्महत्येमुळे मालिकेच्या सेटवर खळबळ उडाली आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला.गेल्या काही दिवसांपासून ती तणावात असल्याचे बोलले जात आहे. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
तुनीषा शर्माने शनिवारी दुपारी वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेले होते, पण रस्त्यातच तिचे निधन झाले. तुनिषाने नेमकी आत्महत्या का केली तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.
तुनिषा शर्माने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये या मालिकेत ति शहजादी मरियमची भूमिका साकारत होती. चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पूंछवाला, शेर-ए-पंजाब : महाराजा रणजीत सिंग, इंटरनेट वाला लव्ह, इश्क सुभान अल्लाह आणि अलिबाबा: भारत का वीरपुत्र – महाराणा प्रताप, यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
फितूर, बार बार देखो, कहानी २ मध्ये अभिनेत्री विद्या बालन, तर दबंग ३ सिनेमात अभिनेता सलमान खान यांच्यासोबतही काम केले होते. फितूर आणि बार बार देखो या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने कॅट्रिना कैफच्या तरुणपणीची भूमिका केली होती, तर कहानी 2 मध्ये ती विद्या बालनच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तिने सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची भूमिका असलेल्या दबंग ३ मध्ये कॅमिओ देखील केला होता.
लिव्ह इन पार्टनरची हत्या करून ७ महिने केले नाटक
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055