Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : जॉनी लिव्हरची मुलगी जेमी व्हिडिओ कॉलवर ऑडिशन देत होती आणि दिग्दर्शक म्हणाला- कपडे काढा….

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : ज्येष्ठ अभिनेता जॉनी लिव्हरची मुलगी जेमी तिच्या विनोदामुळे मनोरंजनाच्या दुनियेत ओळखली जाते. या माध्यमातून ती खूप मनोरंजनही करते. तिला आपल्या पित्याप्रमाणे चित्रपटांमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. त्यामुळे जेमी ऑडिशन देत असते. पण एकदा ऑडिशनमध्ये दिग्दर्शकाने तिच्याकडून एक घाणेरडी मागणी केली होती. त्यानंतर जेमी खूप घाबरली. स्वतः जेमीने याबद्दल सांगितले.

झूमशी बोलताना जेमी म्हणाली ‘त्याने मला सांगितले की, तो स्क्रिप्ट शेअर करणार नाही कारण त्याला ऑडिशनमध्ये इम्प्रोव्हायझेशन हवे आहे.’ त्यानंतर थोड्याच वेळात एक मीटिंग लिंक आली. जेमीने त्या मीटिंग लिंकवर क्लिक केले. जेमीचा व्हिडिओ चालू झाला. पण समोरच्या व्यक्तीने व्हिडिओ चालू केला नाही. जेमी म्हणाली ‘तो व्यक्ती स्वतःला दिग्दर्शक म्हणत होता आणि तो म्हणाला की तो ट्रान्झिटमध्ये आहे म्हणून तो त्याचा व्हिडिओ चालू करू शकत नाही. हा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे ज्यासाठी आम्ही तुला कास्ट करत आहोत. तू त्यासाठी फिट आहेस. पण काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला तपासायच्या आहेत.’

Advertisements

जेमीला कपडे काढायला सांगितले….

जेमी पुढे म्हणाली, ‘त्याने मला कल्पना करायला सांगितले की एक ५० वर्षांचा माणूस तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. आणि त्यानंतर एक इंटिमेट सीन असेल. परंतु मी म्हणाले , मला इंटिमेट सीन्स करायला आवडत नाहीत. जेव्हा स्क्रिप्ट असेल तेव्हा मी ते फॉलो करेन. परंतु तो म्हणाला की, कोणतीही स्क्रिप्ट नाही. ती इम्प्रोव्हाइज्ड असेल, म्हणून जर तुम्हाला तुमचे कपडे काढायचे असतील, किंवा काही बोलायचे असेल, किंवा दुसरे काही करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता.’

Advertisements
Advertisements

जेमी म्हणाली, ‘स्ट्रिप ऐकताच मी म्हणाले की ,कोणीही मला याबद्दल सांगितले नव्हते. मला यात कम्फर्टेबल वाटत नाही. तो पुढे म्हणाला की, हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि आम्ही तुम्हाला त्यासाठी कास्ट करू इच्छितो. तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. पण मी त्याला स्पष्टपणे सांगितले की, साहेब तुम्ही मला व्हिडिओ कॉलवर माझे कपडे काढायला सांगत आहात. मला यात कम्फर्टेबल वाटत नाही. आणि मला याबद्दल सांगितलेही गेले नाही. मला आता तुमच्याशी बोलायला आवडत नाही. यानंतर मी कॉल डिस्कनेक्ट केला.’ हा कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, जेमीला लक्षात आले की हा एक मोठा स्कॅम आहे. पण मी सावध झाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!