Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुलांना ओलीस ठेवून मागण्यासाठी व्हिडिओ बनविणा-या रोहित आर्याचा एन्काऊंटर 

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत साधारण 17 मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करतान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यातच त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली होती. मुलांची सुटका केल्यानंतर रोहित आर्या याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रोहित आर्याचे एन्काऊंटर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Advertisements

रोहित आर्या व्हिडीओमध्ये म्हणाला की, मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे. मी एक प्लान बनवला आणि काही मुलांना डांबून ठेवले. माझ्या फार काही मागण्या नाहीत. खूप साध्या मागण्या आहेत. खूप मॉरल आणि एथिकल मागण्या आहेत. तसेच माझी काही प्रश्न आहेत मला काही लोकांशी बोलायचे आहे. त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरे देखील हवी आहेत. मला दुसरे काहीच नको. ना मी दहशतवादी आहे ना माझी पैशांची मागणी आहे. इमॉरल तर अजिबातच नाही. मला साधे सरळ भाषण करायचे आहे ज्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवले आहे. तुमची एखाद्या छोट्या चुकीमुळे मला प्रवृत्त केले तर मी हे ठिकाण जाळून टाकेन. मी मरेन की नाही माहिती नाही पण मुलांना दुखापत नक्की होईल. त्यांना मोठा सदमा बसेल. त्यापलीकडे जर काही झाले तर मला सांगू नका. या सगळ्याला मला दोषी ठरवू नये. त्या लोकांना दोषी ठरवा जे उगाचच प्रवृत्त करत आहेत. एका सर्वसामान्य माणसाला केवळ बोलायचे आहे.

Advertisements
Advertisements

पुढे तो म्हणाला, दिपक केसरकर शिक्षण मंत्री असताना त्याने माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत योजनेचे काम घेतले होते परंतु त्याचे बिल मिळाले नाही त्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेक वेळा भेटून झाले. दि. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज / उद्या असेच होत आहे. आजापासून तीव्र उपोषण सुरु केले. आता पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल असे रोहित आर्या म्हणाला.

वेब सीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने रोहित आर्याने पवईत मुलांचे ऑडिशन घेतले. पण आज त्याने जवळपास २० मुलांना डांबून ठेवले आणि काही मागण्या केल्या. आता पोलिसांनी रोहित आर्याला ताब्यात घेतले असून मुलांना सुखरुप बाहेर काढले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!