Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Top News | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Mahanayak | Manorangaj

Spread the love

Top News

साराच्या साधेपणाचे कौतुक

साराने अली खानने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचे काही मित्र आणि मैत्रीणदेखील आहेत. या व्हिडीओत सारा म्हणते, ‘नमस्कार प्रेक्षकांनो, आम्ही मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कारण मेहनत नाही तर फळंही नाही. ट्रेनमधून उतरल्यावर आम्ही रिक्षाने पुढे जाणार आहोत.” त्यानंतर ती पुन्हा रिक्षात दिसते आणि इच्छित स्थळी पोहोचल्याचे सांगते.

https://www.instagram.com/p/Cl825v4j9ze/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असून इतर प्रवासी नेहमीसारखे प्रवास करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या नादात आहे. गंमत म्हणजे या साराच्या या संपूर्ण प्रवासात तिला कोणीही ओळखले नाही. आपल्याच डब्यात सारा अली खान आहे याचा अंदाज कोणालाही आला नाही. साराने तिच्या ठिकाणी पोहोचल्यावर हा तिच्या लोकल प्रवासाचा व्हिडीओ पोस्ट केला. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाचा चर्चेचा विषय ठरतोय. साराच्या साधेपणाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत जिनिलियाची एण्ट्री

‘रंग माझा वेगळा’ कायम टीआरपीच्या यादीत पहिल्या पाचमध्ये असते. या मालिकेची कथा आणि कलाकार दोन्हीही प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत. सध्या मालिकेत दीपा आणि कार्तिक दोघे वेगळे राहत असल्याचं चित्र आहे. त्यात कार्तिकही पुन्हा एकदा फर्टिलिटी टेस्ट करण्यास नकार देत आहे. मात्र आता हे चित्र बदलण्यासाठी मालिकेत एका खास पाहुणीची एण्ट्री होणार आहे. कार्तिक आणि दीपा यांच्यातील दुरावा मिटवण्यासाठी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसुजा ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत धमाकेदार एण्ट्री करणार आहे. जिनिलिया लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे. जिनिलिया लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिनिलिया या मालिकेत झळकणार आहे

 

 

 

Current Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिक वर


#Vacancy | #Wanted | #Requerment


Work With Us : ♦ Requirement : Marketing / Advertising | Part Time / Full Time / Remote Work | Payment : Commission Basis | Location : Aurangabad | Good Communication Skills | For Details WhatsApp Now : 9420379055


#Admission Open Classes | Register Now | #ActivityClasses

 

 


#Trasport Mini Truck Dealers & Service : 9762041481 

News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!