Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live update

Spread the love

10. Dec. 2022 – Thursday

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. Current Update | 📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


 

  • पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही संधी, लवकरच लागू होणार नवे नियम
    मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांसाठीही संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार आहे

 

  • कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत आज 10 डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई Mumbai येथे सकाळी 10 वाजेपासून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील 8 हजार 608 इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेळाव्यात या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून नोकरीइच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केले आहे.

 

  • नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नांदेडमध्ये ३ रिस्टरस्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे.

 

  • महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शाहांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही : बसवराज बोम्मई यांचे ट्वीट

 

  • नंदूरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांना जोडणारा रोषमाळ-तळोदा राष्ट्रीय महामार्गावरील चांदसैली घाटात वारंवार होणाऱ्या दरड कोसळण्याचा घटनांमुळे आणि खराब रस्त्यामुळे घाटात अनेक ठिकाणी प्रवास धोकेदायक झाला होता. अखेर घाटात वारंवार होणाऱ्या भूस्सखलनाच्या ठिकाणी संरक्षण भिंती आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हा घाट 8 जानेवारी पर्यंत बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनाच्या व्यतिरिक्त इतर सर्व वाहनाच्या वाहतुकीवर बंदी राहणार आहे.

 

  • जळगाव Jalgaon :  मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी मी अधिवेशनात पार पडणार; मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

 

  • रत्नागिरी- रायगड Ratnagiti Raigad : जिल्हे जोडणाऱ्या आंबेत म्हाप्रळ पुलाच्या दुरुस्तीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन अखेर मागे; पुलाच्या दुरुस्तीकामाची वर्क ऑर्डर दिल्याने आंदोलन स्थगित

 

  • चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे पुण्यात Pune पडसाद, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

 

  • कर्नाटक विरोधात महाविकास आघाडीचे आज Kolhapur कोल्हापुरात आंदोलन

 

  • औरंगाबाद Aurangabad रेल्वे स्थानकावरील मालधक्का दौलताबाद येथे हलविण्याच्या हालचाली.

 

  • समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

 

  • फिफा FIFA विश्वचषक स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. विजेतेपदाचा दावेदार ब्राझीलला उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. क्रोएशियाने पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझीलला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केले आहे. या विजयासह क्रोएशियाने उपांत्य फेरीत स्थान पटकावलेय.

 


News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!