Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बॉलिवूडचे सुपर स्टार धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप ….

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आणि ते अनंतात विलीन झाले. मुंबईतील विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या सुपरस्टारला अखेरचा अलविदा करण्यासाठी जवळपास अख्खं बॉलिवूड उपस्थित होते . यावेळी त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांच्यसह संपूर्ण देओल कुटुंब शोकसागरात बुडाले होते.

Advertisements

हिंदी सिनेमांचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या जगाचा निरोप घेतला. सोमवारी म्हणजे, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मेंद्र यांचं निधन झालं. मुंबईत विले पार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांचा थोरला लेक सनी देओलनं त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. धर्मेंद्र यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

अंत्यसंस्कारावेळी कोण-कोण झालं सामील?

धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खान, सलीम खान, संजय दत्त, आमिर खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शबाना आजमी, पूनम ढिल्लों यांच्यासह अनेक बडे स्टार्सही धर्मेंद्र यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!