Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अतिवृष्टी मदतीत राज्य सरकारचा मोठा घोटाळा? प्रस्तावच केंद्राला न पाठवल्याची उघड!

Spread the love

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात राज्य सरकारने गंभीर चूक केली आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची चुकीची माहिती केंद्राला दिली आहे. १४ लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचे सांगितले असताना, केंद्राला फक्त १.१० लाख हेक्टरचाच आकडा दिला आहे.

केंद्राने दिली मदत, पण…

राज्य सरकारच्या प्रस्तावाशिवायही केंद्राने ३ हजार १३२.८० कोटी रुपये मदत म्हणून दिले आहेत. मात्र, राज्य सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळण्यात अडचणी येत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला आहे. मात्र, पाहणी होऊनही राज्य सरकारकडून अंतिम प्रस्ताव अद्याप केंद्राला प्राप्त झालेला नाही.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीची गरज आहे, पण राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ही मदत मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!