ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन
मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी ओळख असलेल्या मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घआजाराने त्रस्त होते. मुंबईतील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
गोवा- हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केली. रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या गाजलेल्या नाटकात त्यांनी अभिनय केला. यासोबतच निवडुंग, पोरका, कैवारी, जावई माझा भला अशा अनेक मराठी सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. जवळपास ५० वर्ष सुखटणकर यांनी रंगभूमीची सेवा केली. या काळात त्यांनी कोणत्याही मानधनाची कधी अपेक्षा केली नाही. सुखटणकरांच्या निधनाने रंगभूमी आणि सिनेमांमधला नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
मोहनदास सुखटणकर
रावसाहेब दानवे – तो व्हायरल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा…
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055