रावसाहेब दानवे – तो व्हायरल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा…

Advertisements
Advertisements
Spread the love

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या काही नेत्यांनी तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधाने केली आहेत याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओनंतर रावसाहेब दानवे यांच्यावरदेखील टीका केली जात होती. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे.

Advertisements

“काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे,” सध्या हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. माझ्या त्या विधानाची मी तेव्हाच माफी मागितली होती. आताही पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो. आज मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी ते वक्तव्य आज केल्याचे दाखवले जात असून ते चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

Advertisements
Advertisements

Viral Video Update : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही जीभ घसरली , शिवरायांचा केला एकेरी उल्लेख …


News Update on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!