Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : सीमा प्रश्नावर अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील, फडणवीसांचे पवारांना उत्तर …

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा वादावर आपली तीव्र प्रतिक्रिया देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया गांभीर्याने घेताना, ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नाही. निश्चितपणे तिथले  सरकार, केंद्रसरकार आणि राज्य सरकार हे ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील लोकांनाही माझी विनंती आहे, की अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील. या कोणाच्या हिताच्या नाहीत.” असे म्हटले आहे.


महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना आज घडली. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आज पत्रकारपरिषद घेत ४८ तासांचा अल्टिमेटमही दिला आहे. येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपले  नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावे  लागेल, असे  शरद पवारांनी म्हटले  आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की , “शेवटी त्या भागात राहणारे आपली जे लोक आहेत ते नेहमीच आमच्या सगळ्यांच्या संपर्कात असतात. आमच्याशीही ते बोलत असतात. त्यांची सार्थ अपेक्षा असते की, आपल्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे, आपण देतो देखील. पण मला असं वाटतं की ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नाही. निश्चितपणे तिथलं सरकार, केंद्रसरकार आणि राज्य सरकार हे ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील लोकांनाही माझी विनंती आहे, की अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील. या कोणाच्या हिताच्या नाहीत.”

याशिवाय, “मला असं वाटतं की एखाद्या अॅक्शन रिअॅक्शन येते, पण महाराष्ट्र हे न्यायउचित आणि न्यापूर्ण अशाप्रकारचं राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही असं करू नये, असे  माझे आवाहान असेल. महाराष्ट्र शेवटी देशात आपल्या न्यायप्रियतेसाठी ओळखले  जाते  आणि अन्य राज्यांपेक्षा आमचे  वेगळेपणही हे आहे, की महाराष्ट्रात कायद्याचे  राज्य नेहमीच राहिलेले  आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना कोणीही करू नये आणि कोणी करत असेल तर त्याला पोलीस रोखतील हे देखील मी यानिमित्त सांगू इच्छितो.” असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

दरम्यान “मला असे  वाटते  आणि कर्नाटक राज्यालादेखील माझे  सांगणे  आहे, की सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील सुनावणी सुरू असताना, कुठलही चिथावणीखोर वक्तव्य करणे  किंवा तिथली परिस्थिती बिघडवणे , हे योग्य नाही. कायदेशीरही नाही आणि दोन्ही राज्यांच्या हिताचेही नाही.” असेही   फडणवीस शेवटी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!