Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कमाल झाली !! पोस्टरवर छापला डॉ . बाबासाहेबांचा भगव्या वस्त्रातील फोटो …!!

Spread the love

चेन्नई : तामिळनाडूमधील ‘इंदू मक्कल काची’ (हिंदू लोकांचा पक्ष) या राजकीय पक्षाकडून महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक वादग्रस्त पोस्टर जारी केले असल्याचे वृत्त आहे. या पोस्टरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भगवा पोशाख घालण्यात आला आहे. यातून आंबेडकर हे ‘भगव्या’ विचारांचे नेते असल्याचे चित्रित करण्याचा प्रयत्न ‘इंदू मक्कल काची’ पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.


एका वृत्तानुसार हे पोस्टर तामिळनाडू राज्यात विविध ठिकाणी भिंतीवर लावण्यात आले आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया येत असून अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना तामिळनाडूमधील व्हीसीकेचे प्रमुख आणि खासदार थोल थिरुमालावलन यांनी या घटनेचा निषेध केला असून “भारतीय राज्यघटनेच्या जनकाचा फोटो चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून हा फोटो त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे” अशी प्रतिक्रिया थिरुमालावलन यांनी दिली.

डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘इंदू मक्कल काची’ या पक्षाने राज्याच्या काही भागांमध्ये आंबेडकरांचं पोस्टर भिंतींवर लावले आहे. ज्यामध्ये आंबेडकरांच्या अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्माच्या तीन रेषा लावण्यात आल्या आहेत. आंबेडकरांच्या या फोटोतून ते ‘उजव्या विचारांचे’ असल्याचे चित्रित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर ‘इंदू मक्कल काची’चे नेते अर्जुन संपत आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांचाही फोटो लावण्यात आला आहे. हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!