HingoliNewsUpdate : दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केली अवैध दारू , 2,57,000 चा मुददेमाल जप्त

हिंगोली / प्रभाकर नांगरे : पेट्रोलींग करीत असतांना हिंगोली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने पो.स्टे . गोरेगाव हददीतील कनेरगाव नाका येथे परीसरात अवैध्दरित्या विक्री करीता मोरोती सुझुकी कार मध्ये घेऊन जाणारे देशी दारू भिंगरी संत्राचे तब्बल 15 बॉक्स एका बॉक्समध्ये 180 एम.एल. चे 48 बॉटल प्रमाणे 720 बॉटल किंमत 57,600 रू . चा मुददेमाल व एक मारोती सुझुकी व्हॅगनर कार किं . 2,00,000 रू . असा एकुण 2,57,600 रू . चा मुददेमाल जप्त केला.
नमुद मुददेमाल घेवुन जाणारे 1 ) अभय बबन इंगळे रा . महादेववाडी हिंगोली 2 ) शुभम गजानन भावके रा . गवळीपुरा हिंगोली व कनेरगाव येथील नमुद जैस्वाल देशी दारू दुकाणाचा मालक असे 03 इसमांविरूध्द सहा . पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांचे तकारी वरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ( ई ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हिंगोली श्री . जी . श्रीधर यांचे मार्गदर्शनात सहा . पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु , पोलीस अंमलदार अर्जुन पडघन , आझम प्यारेवाले , विजय घुगे यांनी केली .