Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : धक्कादायक : चिमुरडीवर शाळेत दोन महिने लैंगिक अत्याचार, शिक्षण मंत्र्यांकडून शाळेची मान्यता रद्द ..

Spread the love

मुख्याध्यापिका आणि आरोपी चालकाला अटक

हैदराबाद : हैदराबादमधील एका खासगी शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर दोन महिने लैंगिक अत्याचार  झाल्याची घटना घडली आहे. तेलंगणाच्या शिक्षणमंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनी त्या शाळेला दिलेली सरकारी मान्यता तात्काळ रद्द करून विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. तेलंगणाच्या शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणत्या सुरक्षा उपाययोजना केल्या जाऊ शकतात याचा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिकेला आणि तिच्या आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 


या समितीमध्ये शालेय शिक्षण संचालक, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांच्या संरक्षणासाठी काम करणारे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून असतील. या समितीला आठवडाभरात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बंजारा हिल्स परिसरात असलेल्या खासगी शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवरील  बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर हि शाळा तत्काळ बंद  करण्यात आली.  या प्रकरणात दोन महिन्यांहून अधिक काळ मुलीवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या चालकाला बुधवारी अटक करण्यात आली. दरम्यान हे प्रकरण गांभीर्याने न घेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही पीडितेच्या पालकाच्या तक्रारीनंतर  अटक करण्यात आली.

लक्षात कसे आले ?

मुलीच्या  वागण्यात झालेला बदल पालकांच्या लक्षात आला आणि जेव्हा आईने मुलीची चौकशी केली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्यासोबत काहीतरी भयंकर कृत्य करण्यात आले आहे. या मुलीने ड्रायव्हरकडे बोट दाखवले होते. हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी चालकाला मारहाण केली आणि बंजारा हिल्स पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला.


७०० विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत स्थलांतर

या प्रकरणाच्या चौकशीत शाळेत सीसीटीव्ही काम करत नसल्याचे आढळून आले. आरोपी चालकाने अनेकदा पूर्वप्राथमिक विभागासाठी शिक्षक म्हणून काम केल्याचेही समजते. मुलांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापनाला कडक संदेश देण्याच्या मंत्र्यांच्या कारवाईमुळे संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे. या शाळेत ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत असून या सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्याचे  शिक्षण विभागासमोर मोठे निर्माण झाले आहे. मात्र, जिल्हा शिक्षणाधिकारी विद्यार्थी आणि पालकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करतील, असे मंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेनुसार शाळेची मान्यता रद्द करून  शाळा बंद करणे आणि मुलांचे स्थलांतर करणे हा व्यवहार्य पर्याय दिसत नाही.

काय काळजी घ्यावी ?

खरे तर मुलांविरुद्धचे लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी प्रोटोकॉल, तसेच घरात आणि शाळांमध्ये मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, कायद्यात तपशीलवार वर्णन केले आहेत, परंतु त्यांचे पालन न केल्यामुळे अशा घटना घडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुनीता कृष्णन, ज्या अनेक वर्षांपासून ज्ञात लैंगिक गुन्हेगारांच्या सार्वजनिक नोंदणीच्या गरजेची वकिली करत आहेत, त्यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. शाळा व इतर संस्थांमध्ये नियुक्त्या करताना डेटाबेसचा वापर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी सुनीता कृष्णन यांच्या ट्विटवर सकारात्मक प्रतिक्रिया देताना सरकार या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!