Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : खा.विनायक राऊत, प्रा सुषमा अंधारे व आ.भास्कर जाधव यांच्या विरोधात गुन्हे दाखल …

Spread the love

मुंबई : आक्षेपार्ह भाषण प्रकरणी खा.विनायक राऊत, प्रा सुषमा अंधारे व आ.भास्कर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


उद्धव ठाकरे गटाकडून सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. त्याची सुरुवात रविवारी ठाण्यातून करण्यात आली. यावेळी या मेळाव्याला विनायक राऊत,भास्कर जाधव, सुषमा अंधारे , अनिता बिर्जे, मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे आदींसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  या कार्यक्रमात त्यांच्याकडून झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नकल करणे अशा स्वरूपाची तक्रार करण्यात आली आहे त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे शिंदे गटाने ठाकरे गटात तेढ निर्माण होईल असेही तक्रारीत  नमूद करण्यात आले आहे.  बाळा गवस यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार 9 ऑक्टोंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंडखोर सेना नेत्यांवर तुफान हल्लाबोल केला. भास्कर जाधव, सुषमा अंधारे, विनायक राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला. यावेळी भास्कर जाधवांनी शिंदेंची नक्कल केली, राऊतांनी राणेंची नक्लल केली, तर अंधारेंनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली. त्यावरून त्यांच्याविरुद्ध कलम 153,500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत दोन गटात हाणामारी करण्याच्या उद्देशाने आणि नेत्यांची बदनामी करण्याच्या उद्धेशाने त्यांनी हे वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!