Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NarendraModiNewsUpdate : “आप” चे नाव न घेता पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका …

Spread the love

राजकोट (गुजरात) : काँग्रेसने आपल्या विरोधात अपशब्द उच्चारण्याचा ठेका दुसऱ्या कोणाला दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. राजकोट जिल्ह्यातील जामकादोर्णा शहरातील एका सभेत मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसपासून सावध राहण्यास सांगितले. ते म्हणाले की काँग्रेसने त्यांच्या विरोधात बोलणे बंद केले आहे आणि ग्रामीण मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी “शांतपणे काम” सुरु केले आहे.


पंतप्रधान म्हणाले, “गेल्या 20 वर्षांत गुजरातच्या विरोधात असलेल्यांनी राज्याची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या मनात जे काही आले ते माझ्या विरोधात बोलले आणि  अगदी  मला ‘मौत का सौदागर’ही बनवून टाकले.

आम आदमी पक्षाचे (आप) नाव न घेता ते म्हणाले, “अचानक ते शांत झाले आहेत. माझ्या विरोधात गोंधळ आणि अपशब्द बोलण्याचा ठेका त्यांनी इतरांना दिला आहे. ते शांतपणे गावोगावी जाऊन लोकांना मतदानासाठी सांगत आहेत. मोदी पुढे म्हणाले, विरोधी पक्षाच्या शांतपणे काम करण्याच्या या रणनीतीपासून मी तुम्हाला सावध करतो. मला माहित आहे की ते दिल्लीतून गुजरातविरुद्ध कट रचत रचत आहेत.

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ गुजरातमध्ये बांधलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला त्यांनी भेट दिली होती का, हे त्यांनी काँग्रेस नेत्यांना विचारण्यास सांगितले. गुजरातच्या मातीचे लाल असलेल्या  सरदार पटेलांना मान न देणाऱ्यांना गुजरातमध्ये थारा नसावा, अशी टीका करीत मोदी म्हणाले कि , ‘सरकारने कोणत्याही भ्रष्टावर कारवाई केली तर एक गट आमच्या विरोधात ओरडतो. लोकांना लुटणाऱ्यांवर कारवाई करू नये का?

आपलं सरकार

Click to listen highlighted text!