Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर …, नाथांच्या दर्शनाला “एकनाथ” …!!

Spread the love

मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पावणे दोन तास बैठक झाली. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यावरही  या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील सर्व बंडखोर आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये राज्यात सर्वत्र वाद चालू आहेत . या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच वादातून मुंबईतील प्रभादेवी इथे शिंदे आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला. या प्रकरणात दोन्हीही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर  शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय  गृहविभागतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत, त्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा
औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
सोमवार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. मुंबई येथून शासकीय विमानाने चिकलठाणा, औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 12.30 वा. चिकलठाणा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने पैठणकडे प्रयाण.
दुपारी 1.40 वा. संत एकनाथ महाराज मंदिरास भेट व नाथ महाराजांचे दर्शन. (स्थळ: पैठण, जि.औरंगाबाद)
दुपारी 1.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.
दुपारी 2 वा. पक्षाच्या जाहीर सभेस उपस्थिती. (स्थळ: कावसानकर स्टेडियम, पैठण)
दुपारी 3.30 वा. पैठण येथून मोटारीने आपेगाव ता. पैठणकडे प्रयाण.
दुपारी 3.45 वा. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन (स्थळ: आपेगाव, ता.पैठण).
सायं 4.15 वा. आपेगाव, ता.पैठण येथून मोटारीने पाचोड ता. पैठणकडे प्रयाण.
सायं 4.45 वा. श्री. संदिपान भुमरे, मंत्री, रोहयो व फलोत्पादन यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव (स्थळ : पाचोड ता.पैठण)
सायं 5.15 वा. पाचोड ता.पैठण येथून मोटारीने आडूळ मार्गे चिकलठाणा विमानतळ औरंगाबादकडे प्रयाण.
सायं 6 वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!