Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : दुःखदायक : मंत्रालयासमोर जाळून घेतलेल्या शेतकऱ्याचे निधन …

Spread the love

मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज उपचारादरम्यान, या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.


सुभाष भानुदास देशमुख असे  या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. २३ ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे भाजले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज २९ ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी त्यांना ११:५५ वा. मयत घोषित केले.

आपली  गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.दरम्यान  त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी  तत्काळ आग विझून त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या  मदतीने GT Hospital याठिकाणी उपचाराकरिता नेण्यात आले होते. जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!