Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : शिवसेनेकडून उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची हकालपट्टी ….

Spread the love

मुंबई : एकीकडे शिवसेनेच्या वतीने १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी असतानाच दुसरीकडे पक्षाविरोधात कारवाया केल्याचा ठपका ठेवत  शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत आणि आमदार यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबद्दल सेनेच्या कार्यालयातून पत्रक काढले आहे.


अधिवेशनाच्या दरम्यान बंडखोर आमदारांवर शिवसेनानेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत यांनी ‘गद्दार या शब्दाची व्याख्या मला कळत नाही. त्यामुळे गद्दार या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर, त्यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगताय की, आमची नैसर्गिक आघाडी नव्हती. ही आघाडी कशी झाली, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस जर एकत्र लढली असती तर काही म्हणण्याचे कारण नव्हते. पण शिवसेना आणि भाजप एकत्र लढली मतदारांनी आम्हाला संधी दिली. त्यानंतर भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही गद्दारी होत नाही का? असा सवाल केला होता.

दरम्यान पुणे दौऱ्याच्या वेळी उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी दगडफेकही केली होती.  शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मंत्री उदय सामंत आणि आमदार यशवंत जाधव हे शिंदे गटात सामील झाले होते. मागील काही दिवसांपासून उदय सामंत यांनी उघडपणे शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अधिवेशनामध्ये उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेने हि कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यशवंत जाधव आणि उदय सामंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!