Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : शिवसेनेच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजच होणार सुनावणी …

Spread the love

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भवितव्य ठरविणाऱ्या याचिकेवरील सुनावणीला आजच सुरुवात झाली आहे. आज  दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होत आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होते आहे.


या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल , अभिषेक मनु सिंघवी  तर शिंदे गटाकडून  हरीश साळवे  सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. तर निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत. यापूर्वी ३ आणि ४ ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं. शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं घेण्याची विनंती करण्यात आली या विनंतीवरून आजच  या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

गेल्या दोन दिवसनपासून या सुनावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते कारण गेल्या २४ तासात दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली  होती. सुनावणीची नक्की तारीख न मिळाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.  विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये या सुनावणीच्या समावेश नव्हता. त्यामुळे सुनावणी आज होण्याची शक्यता कमीच दिसत होती. अशातच वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पटलावर घ्यायला मान्यता दिली आहे. त्यामुळे आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!