Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraAssemblyUpdate : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांची जोरदार घोषणाबाजी …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  राज्य सरकारचे  पावसाळी अधिवेशन चालू असताना विधानसभवनाच्या पायऱ्यांवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.


“ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, ५० खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले”, अशा अनेक घोषणा देत विरोधकांनीआजही सरकारविरोधी सूर धरला.

Advertisements

अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात अशीच घोषणाबाजी केली होती. त्याच पद्धतीने आज तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा महाविकासआघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे ईडी सरकार असल्याची खोचक टीकाही करण्यात आली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!