Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SanjayRautNewsUpdate : खा. संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ…

Spread the love

मुंबई : ईडीकडून  पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत  यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना ८ दिवसांच्या ईडी  कोठडीनंतर २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले  होते . सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टाने  संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.


पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीने  अटक केली होती. ८ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले  होते . तिथे ईडीने  त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.

दरम्यान आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे  जेवण आणि औषधी  पुरवण्याची मुभा न्यायालयाने  दिली  होती. आज पुन्हा त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने  समन्स बजावले  होते . त्यांचीही चौकशी करण्यात आली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!